काळजाचा ठोका चुकवणारा तो क्षण! धोनी मैदानावर आल्यावर करोडो चाहत्यांनी रोखला श्वास, रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांची नोंद - Qoneqt
seach-icon
 • user-img

  Bapuji Patil in News

  13-Apr-2023 04:39 PM


  thumbnail

  काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण! धोनी मैदानावर आल्यावर करोडो चाहत्यांनी रोखला श्वास, रेकॉर्डब्रेक प्रेक्षकांची नोंद

  इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील गेल्या काही सामन्यांमध्ये शेवटच्या षटकांचा थरार सातत्यानं आणि एका वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळत आहे. आयपीएल 2023 मधील चेन्नई आणि राजस्थान यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात असंच काहीसं घडलं. चेन्नई आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या षटकावेळी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या सामन्याच्या शेवटच्या षटकात चेन्नई संघाला विजयासाठी 21 धावांची गरज होती, त्यापैकी धोनीने 2 चेंडूत सलग 2 षटकार मारून सामना अतिशय रोमांचक बनवला. त्यानंतर राजस्थान संघाने हा सामना तीन धावांनी जिंकला, पण धोनीने पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांच्या ठोके वाढवले होते, हे मात्र नक्की.


  काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण!
  राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोनी 17 चेंडूत 32 धावा आणि रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 25 धावा केला. धोनी आणि जडेजाने शेवटच्या षटकात चित्तथरारक कामगिरी केली. चेन्नईला अखेरच्या षटकात 21 धावांची गरज होती. धोनी आणि जडेजाने शेवटच्या चेंडूपर्यंत आटोकाठ प्रयत्न करुन संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. धोनीने शेवटच्या षटकात सलग दोन षटकार ठोकल्यावर जणू पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. धोनी मैदानात खेळण्यासाठी उतरल्यावर करोडो प्रेक्षकांनी श्वास रोखून धरल होता. धोनीला खेळ पाहण्यासाठी 2.2 कोटी क्रिकेट चाहते ऑनलाईन हा सामना जिओ सिनेमावर पाहत होते.
  #tataipl2023
  Source:- ABPmaza


  • Sonal Shridhar Shinde

   :star_struck::star_struck::star_struck::star_struck::star_struck: