सातारच्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत ट्रेन, ठरल्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट - Qoneqt
seach-icon
 • user-img

  Bapuji Patil in News

  14-Mar-2023 10:19 AM


  thumbnail

  सातारच्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत ट्रेन, ठरल्या आशियातील पहिल्या महिला लोको पायलट

  मुंबई : भारतातील महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवत आहेत. देश-विदेशातील भारतीय महिलांची क्षमता ओळखून त्यांना सन्माननीय पदांची जबाबदारी दिली जात आहे. आजच्या महिला सर्व काही करू शकतात. स्त्रिया आकाशात विमान उडवण्यापासून ते रुळांवरून ट्रेन चालवण्यास सक्षम आहेत. अशा यशस्वी महिलांमध्ये सातारा जिल्ह्यातील सुरेखा यादव ( Surekha Yadav) यांचाही समावेश आहे. सुरेखा यादव या भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिल्या लोको पायलट (Loco Pilot ) ठरल्या आहेत.

  आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (vande bharat express) चालवली. यावेळी सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले आहे.

  या कामगिरीबद्दल सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक आठवर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सुरेखा यादव म्हणाल्या, "नवीन काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे. गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या पाच मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो."
  Source:- ABPmaza
  #vandebharattrain