seach-icon
  • user-img

    Bapuji Patil in News

    13-Mar-2023 09:52 AM


    thumbnail

    Oscar Awards 2023: भारतासाठी अभिमानाचा क्षण; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'नाटू नाटू'वर परफॉर्मन्स, प्रेक्षकांकडून 'स्टँडिंग ओव्हेशन'!

    95 वा ऑस्कर पुरस्कार #Oscar 2023 सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये सुरु आहे. जगभरातील लोकांचे लक्ष लागले आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे. एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' #RRR या सुपरहिट सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याला 'ओरिजनल सॉन्ग' या कॅटेगरीमध्ये ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालं आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक काल भैरव (Kaala Bhairava) आणि राहुल सिपलीगुंज (Rahul Sipligunj) यांनी यांनी 'नाटू नाटू' हे गाणं गायलं. या दोघांच्या परफॉर्मन्सने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली.

    ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी 'नाटू नाटू' हे गाणं गायलं. काही कलाकारांनी 'नाटू नाटू' गाण्यावर नृत्य देखील केलं. स्टेजवरील काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांच्या एनर्जीने अनेकांचे लक्ष वेधले. नाटू नाटू गाण्याची आयकॉनिक स्टेप देखील स्टेजवरील कलाकारांनी केली. प्रेक्षकांमध्ये बसलेले दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिलं. काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यांना 'स्टँडिंग ओव्हेशन' मिळाले.

    95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील 'नाटू नाटू' गाण्याच्या परफॉर्मन्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
    Source:- ABPmaza