seach-icon
  • user-img

    Bapuji Patil in News

    10-Feb-2023 12:12 PM


    thumbnail

    बापाने खेळायला मोबाईल दिला, पोरानं मात्र 'गेमच' केला; 6 वर्षाच्या मुलानं दिली तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर.

    गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाला भूक लागली होती. त्यानंतर त्याने वडिलांच्या मोबाइलवरून 1000 डॉलर्स म्हणजे सुमारे 80 हजार रुपयाच्या जेवणाची ऑर्डर केले. या मुलाच्या वडिलाचे नाव कीथ स्टोनहाउस असून त्याने आपल्या मुलाला मोबाईल गेम खेळायला दिला होता, आणि तेवढ्यात या मुलाने हा 'खेळ' केला.

    कीथ स्टोनहाऊसने सांगितले की, तो आपल्या मुलाला झोपवत होता. तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा त्याला आवाज आला. कीथला वाटले की त्याच्या पत्नीने काहीतरी ऑर्डर केलं आहे. मात्र पुढच्या काही वेळात अनेक वाहने त्याच्या घरासमोर थांबली. सर्व वाहनांमध्ये जेवणाची ऑर्डर होती.
    त्या मुलाने वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली होती. एवढंच नाही तर प्रत्येकाला 25 टक्के टिपही दिली होती.
    Source:- ABPmaza