seach-icon
  • user-img

    Bapuji Patil in News

    23-Jan-2023 06:47 AM


    thumbnail

    Nanded : शेतकरी कुटुंबातील मुलगी रेवा दिलीप जोगदंड हिने आकाश भरारी घेतली आहे.

    कोवीड पुर्व काळात तिने अवघड असे हवाई क्षेत्रातील ज्ञान मिळवत, विमान चालन पात्रता चाचणी पुर्ण केलेली होती.नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने अटकेपार झेंडा रोवला आहे.
    अर्धापूर तालुक्यातील कोंढा या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगी रेवा दिलीप जोगदंड हिने आकाश भरारी घेतली आहे.
    तिची अमेरिकेत इलाईट 2023 कमांडर ऑफ नेवल एअर फोर्स फ्लाईट अकॅडमी करीता निवड झालीय.
    अमेरीकेतील राष्ट्रीय स्तरावर पात्र 500 विद्यार्थ्यांमधुन 26 जणांची निवड झालेल्यांमध्ये रेवा जोगदंडने स्थान मिळविले आहे.
    अमेरीकन सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या तटरक्षक दलाच्या निधीमधुन सुमारे रु. 20 लक्ष रकमेची शिष्यवृत्ती पुढील शिक्षणाकरीता मंजुर केली आहे.
    Source:- ABPmaza
    #farmer