seach-icon
  • user-img

    Rohit Bajirao Deore in News

    13-Jan-2023 05:10 AM


    thumbnail

    Ved : भाऊ-वहिनीनं चाहत्यांना 'याड लावलं'; रितेश-जिनिलियाच्या 'वेड'चं बजेट किती, कमावले किती?

    अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) बहुचर्चित 'वेड' (Ved) हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

    'वेड' हा सिनेमा 30 डिसेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रिलीजच्या 10-12 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाची निर्मिती 15 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने कमाईच्या दुप्पट कमाई कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 35 कोटींचा गल्ला जमवला आहे.

    'वेड' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 20.67 कोटींची कमाई केली होती. गेल्या काही दिवसांपासून रितेश-जिनिलियाचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमा रिलीज होऊन आता 15 दिवस होत आले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही.
    Source:- ABPmaza
    #marathimovie #movie #ved